काही मनातले ..

'दोन घडीचा डाव ' असा विचार कधीच मनाला चाटून जात नाही ना ! असं सवयीचे झालंय सगळेच! श्वास घेणे, सहज संथ लयीत चाललेले असते.सगळे आपापल्या विश्वात,धुंदीत,कैफात! मन मस्त मगन, मन मस्त मगन!
खरेतर कुठे काही घडले, की त्याची बातमी होते.
सर्वांनी वाचण्यासाठी वर्तमानपत्र ती छापतात. चॅनल वाले लहान पडद्यावर ती उमटवतात ! लगेच सर्व मीडिया वाले त्याची दखल घेतात.फार फार तर काही दिवस महिने बातमी फिरते, गोल गोल व्हाट्स ऍप पण मागे नसते.
लोक चुकचुकतात, काही प्रक्षोभक लेख जन्मतात.बातमी जुनी झाली कि तिचा भूतकाळ तयार होतो.
परिणाम किती जणांवर खराखुरा होऊन पडसाद,प्रतिसादात उमटतात? एकतरी जिवंत चळवळ,काही क्रियात्मक जन्माला येते?
नुसती बातमी कानावर पडून हवेत विरून धुवा धुवा, मग उद्या पुन्हा वृत्तपत्रात सापडतो बातम्यांचा खेळ नवा !!
-मोना (श्रिया)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ