अश्रू...
तिची कहाणी....
पूर्ण वाहून गेले तरी..
निशब्द ढळत राहतात...
त्यांची अन तिची साथ..
जुनी, युगायुगांची...
तिच्या आनंदात सामावलेली...
तिच्या वेदनेत भिजलेली....
क्लेशांच्या पलीकडे उठून उभे राहायचा
एक यत्न केला होता तिने..
कधीतरी..
तेव्हा हट्टाला पेटले होते अश्रू...
अन एक सागर बनला..
सर्वांना कळेल तिचे दुःख
म्हणून पिऊन टाकले होते..
पण क्षणिक उरले ते....
मोत्याचे टपोरे दाणे ...
तिला अलगद मोरपिसासारखे कुरवाळत
ओघळतात जेव्हा....
तिलाच कळत नाही...
अडवायचे की वाट करून द्यायची..
’पुरे झाले आवर गं आता ’....
येई अनाहूत सल्ला..
वेदना,भावना आवरायचा उपदेश....
जगाला सगळ्यांचा खटाटोप....
उन्मळून पडणे काय हे फक्त त्या वृक्षालाच ठाऊक!
खोटे हसता येत नाही..
ही काही चूक नाही..
दुःख तरी प्रांजळ असते..
खरे आणि जिवंत....
सजीव असण्याची साक्ष देणारे..
तिच्या भावना ती एकटीच ढाळते....
अश्रूमय..
विझवायचे नाहीये,कारण ते कदापि विझू नाही शकत...
विसरायचे नाही कारण ते विस्मरणाच्या पलीकडले
थांबवायची कशी ही मुक्त सलीला ?
पापण्यांचा बांध इथे अपुरा...
दुःखात सौंदर्य असते...
.मोती जगायला शिकवतात....
तिच्या कविता त्याची साक्ष देतात.....
-श्रिया (मोनिका रेगे )
चित्र जालावरून साभार …
-श्रिया (मोनिका रेगे )
चित्र जालावरून साभार …

छान कविता आहे! त्यासोबतचे चित्रही अगदी समर्पक!
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
हटवाभावना खूप छान व्यक्त झाल्यात!
उत्तर द्याहटवाधन्यवाद भानस....
हटवादु:खाशिवाय सुखाची किंमत कशी कळणार? आणि दु:खाचा एकमेव सोबती..... "अश्रू", कितीही साथ सोड म्हटलं तरी तो आपल्याला दु:खात सोडून जात नाही.... अप्रतिम कविता..
उत्तर द्याहटवाधन्यवाद इंद्रधनू..तुझे अगदी खरे आहे..अश्रू साथ देतात शेवटपर्यंत..खरेतर आपणच आपली साथ देत असतो ....
हटवा>>>’पुरे झाले आवर गं आता ’....
उत्तर द्याहटवायेई अनाहूत सल्ला..
वेदना,भावना आवरायचा उपदेश....
जगाला सगळ्यांचा खटाटोप....
उन्मळून पडणे काय हे फक्त त्या वृक्षालाच ठाऊक!<<<
aga kaay lihilas ga...! khup chhan mandalyat bhavana... khooooop yatharth lihites... love u.. :)
धन्यवाद चैताली....तू दिलेली दाद उत्साह वाढवून गेली माझा..:) कवितांचे आपले जग आणि आपली मैत्री....अशीच टिकून राहो नेहमी....:)
हटवाछान आहे कविता,
उत्तर द्याहटवाहे
’पुरे झाले...
येई अनाहूत सल्ला..
वेदना,भावना आवरायचा उपदेश....
जगाला सगळ्यांचा खटाटोप....
उन्मळून पडणे काय हे फक्त त्या वृक्षालाच ठाऊक! अगदी खरं!
धन्यवाद मोहना...:)
हटवा