पाऊले
पाऊलांना ऐकायचे नसायचे तेव्हां कोणाचे ... स्वतःचेच खरे करायचे मनावर घेतलेले असायचे....... आई म्हणायची "झाडावर चढू नको पडशील".... "पाऊले ऐकत नाहीत ग तुझे आई काय करू सांगशील?" पाऊलांना वाटायचे सायकल शिकायची शंभर वेळा पडले तरी हार नाही मानायची.... बाबा म्हणायचे "सांभाळून बाळ"..... पण पाऊलांना कुठे भीती असायची! शाळेतले खेळ, स्नेहसंमेलनाची वेळ... स्टेजलाच आमची भीती वाटायची..... अभ्यास केला,पण खेळ सांभाळून.... पाऊलांना तेव्हां अभ्यासाची जाण असायची..... हल्ली सारखे फुटले नव्हते क्लासेस चे पेव... स्वतःलाच स्वतःचा देता यायचा वेळ.... पाउलांची वाट तितकी अवघड झाली नव्हती स्पर्धेपाठी सगळी इतकी वेडी झाली नव्हती.... मैदानी खेळ दूरदर्शनवर भारी होते.... आई बाबा संध्याकाळी मुलांसाठी होते.... पाऊलांना अनेक गोष्टी आजीने दिल्या बालपण त्यांचे खूप आल्हाददायक होते.... आज पाऊले मोठी झाली..तरी मन बालपणात रमते... जुने सोबती,शाळा सुटली तरी आठवांमध्ये गुंगते.... ...