Google Buzz ला राम राम.
Google Buzz ला राम राम.....आज पासून बझ्झ दिसत नाहीये. बरेच काही असे ह्या 'buzz बाबाने' दिले जालावरले,लिहिलेले वाचलेले काही लक्षात राहिलेले,असे हे बझ्झबाबा.गुगल बाबांनी ह्यांना एक संधी दिली लोकांपर्यंत गुगलप्रेमी जनतेपर्यंत येऊ दिले.मग बझ्झबाबा प्रसिद्ध झाले आणि मार्गी लागले.अनेक चाहत्यांनी त्यांना उचलून धरले.त्यांचे नाव सर्वत्र ऐकू येऊ लागले.जालावर अनेक बझ्झप्रेमी निर्माण झाले आणि नुस्ता बझ्झ बझाट झाला...इकडे गप्पा,लहानसहान वाद,एक एका शब्दाचा वाक्याचा,एखाद्या गाण्याचा,छान कथा किंवा कवितेचा बझ्झ पडायचा....सकाळी आपापल्या कामावर गेलेल्या मंडळींनी कामाला खरी सुरवात करण्याआधी ह्या 'बझ्झला' सुरवात केलेली असायची.....चहाची वेळ आणि बझ्झ ची वेळ एक होऊ लागली अनेकांची.अनेक संवाद सुरु होत आणि संपत बझ्झ वर....जालाच्या किमयेत बझ्झ नवीन माध्यम.एक प्रकारचे संवाद माध्यम आणि ह्याने अनेकांना माहितीपूर्ण असे काही मिळवून दिले. पण आपल्या गुगलबाबांना मात्र पुढे पुढे जायची खोड आणि न...