Festival of Lights....
सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा !! दिवाळीची गोष्ट सर्व दिवाळीच्या दिवसांचे महत्व आणि दिवाळी एक प्रमुख सणांपैकी म्हणून वाटणारे अप्रूप! दर दिवाळीची मजा वेगळीच! सुटीचा आनंद,आणि दिवाळीच्या तयारीतला उत्साह.घराघरातले वातावरण आणि दुकाने रस्ते सगळीचकडे 'आली दिवाळी' तयारीला लागा अशी नांदी असते.भारतात असताना दिवाळीचा एक वेगळाच अनुभव होता संपूर्ण दिवाळी म्हणता येईल अशी आठवणीत राहिली नेहमीसाठी! लहानपणापासून प्रत्येक दिवाळी सर्वांसोबत साजरी केली. सगळे जवळचे एकत्र जमत आणि हा सण उत्साहात साजरा होत असे. घराला रंग देण्यापासून ते दिव्यांनी घर झगमगून जाईपर्यंत,आकाश कंदिलाची शोभा,पणत्यांची गच्चीतली रोषणाई,फटाक्यांचे आवाज,आकाशात अचानक दिसणारा प्रकाश आणि डोळे भरून दिव्यांना पाहता पाहता मनात देखील अनेक रंग...