संजीवनी
एक अशीच संध्याकाळ.ढग दाटून आलेले.गार वारा सुटलेला,खिडकी हलत होती.अलगद येणाऱ्या वाऱ्यामुळे पडद्याची होणारी हालचाल.वाऱ्याचा झोत आला कि पडदा आतल्या दिशेने खोलीत लहरत होता.नाजूकसा पडदा,नावाला पडदा,त्याच्या आवडीचा रंग असलेला.पाऊस पडेलसं वाटत होते पण अचानक ढग कमी झाल्यासारखे,वाऱ्याचा वेग वाढल्यासारखा.खिडकी तशी जुनी पण अजूनही मजबूत.जुन्या लाकडाची तावदाने,काचा बसलेली,चौकोनी काचा.खिडकीवर कुठूनसे आलेले एक कबुतर हलकेच बसले येऊन.त्याचे पंख त्याने पिसारयासारखे फुलवून अलगद मिटले इकडे तिकडे पाहत आपल्या लुकलुक लाल डोळ्यांची हालचाल करत मानेवरची पिसे हलवत ते पण विसावले होते येऊन त्या खिडकीवर थोडा वेळ. खिडकी जवळची खुर्ची त्याची नेहमीची जागा.त्याचे गिटार वाजवताना ती खेचून खिडकीजवळ घेऊन बसायचा.कधी खुर्ची समोरच्या टेबलावर अर्धवट बसून पण संगीतसाधना चालायची...मूड वर असायचे त्याच्या.आवाज इतका साथ देत नसला तरी संगीत मात्र होते जवळ.पण आज खुर्ची नेहमीच्या जागी होती व्यवस्थित.टेबलवर काही कागद वाऱ्यामुळे इकडे तिकड...