"कुठे काही चुकते आहे का?"
मनात किती वेळा हा विषय येऊन गेला.ह्या विषयावर लिहायचे म्हणजे कमीच आहे!पण लिहायचे आज मनात होते म्हणून हा प्रयत्न!कुठे काय चुकते आहे ते कळण्यास मार्ग नाही पण नक्कीच काहीतरी चुकत जाते.आणि ह्यावर सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. आजोबांचा प्रेमळ धाक आठवतो.त्यांनी शिकवलेली रामरक्षा,श्लोक,पाठांतर,एक प्रकारची शिस्त. घरातले वातावरण आजी आजोबांमुळे आमच्यासाठी खूप वेगळे होते.लहानपण त्यांच्या सोबत कसे उमलून आले आणि अनेक उत्तम संस्काराची बीजे कशी पेरली गेली आमच्यात ते आज जाणवते.त्यांचे घरातले महत्व अनन्यसाधारण होते हे नक्की.मी असा विचार करू शकत नाही कि आमचे घर आणि त्यात मी आई बाबा आणि आम्हीं बहिणी अर्थात,आता आजी आजोबा नाहीत पण ते असताना जो घरात ओलावा होता,त्यांच्यामुळे जे चैतन्य होते ते,आम्हां सर्वांमध्ये नक्कीच उतरले आहे. 'वृद्धाश्रम,ह्या नावात सगळे आले का? 'घरात नको' म्हणून,'निरुपयोगी' म्हणून,असे अनेक शब्द अ...