आमची गच्ची!
गच्ची.....................घराला असली कि उंचावरून बरच काही अनुभवता येते. लहानपणी गच्चीवर खेळायला जायचो,धमाल यायची! सुटीत गच्चीचा वापर खेळण्यासाठी....आणि परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी करत असे मी. गच्चीवरून रात्री चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश बघताना,चटईवर उताणे झोपून गप्पा मारत आम्हीं बहिणी आणि आईबाबांबरोबर ती आकाशगंगा दुर्बिणीतून पाहताना,थंड वाऱ्याच्या झुळ्कीला अंगावर झेलत मस्त पडून राहायचो, डोळे भरून चांदण्या पाहताना थोड्या वेळासाठी शांतपणे एकही शब्द न बोलता ते आकाश अनुभवायचो, मध्येच येणारा रातकिड्यांचा आवाज, एखाद्या पक्ष्याचा आवाज आणि शेजाऱ्यांच्या घरातून येणाऱ्या TV चे आवाज सोडले तर अगदी मध्येच गाड्यांचे व रस्त्यावरच्या तुरळक लोकांचे बोलण्याचे आवाज येत असत.हि गच्चीसहल कधी कधी उकडलेल्या किंवा भाजलेल्या शेंगांची मेजवानी पण घेऊन यायची.कधी कधी तेव्हा बाबा गाणे म्हणत त्यांचा सूर इतका छान लागायचा कि ती संध्याकाळ खरच गच्चीत संगीतमय होऊन डोलू लागायची. शेजाऱ्यांच्या गच्चीचे होणारे दर्शन, वाळत घातलेले कपडे, काहींच्या गच्चीत तर पापड आणि मिरच्या पण वाळत अ...