पोस्ट्स

एप्रिल, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

!!!! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं !!!!

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? डोळे उघडून पहा तरी; प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत! हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं, दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून, गात रहा; आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा. झुळझुळणार्‍या झर्‍याला मनापासून ताल द्या; मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या! इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. कवी – मंगेश पाडगांवकर

माझी मी

इमेज
कधी कधी असा विचार करते कि 'मी कशी आहे?'प्रत्येक व्यक्तीला मी वेगळी वाटते....सर्वांना जाणवणारे असे काही स्वभाव गुणधर्म आहेत ....पण खरी मी कशी आहे हे कोणाला माहित?आहे,पण फक्त मला. कारण ते असे शब्दात सांगता येते का,किती सारया गोष्टी असतात स्वतःला माहित,वाटते पण त्या सांगता येत नाहीत,का येत नाहीत तर वाटून गेले ते सगळे मनातले उघड नसते.किती सारे अनुभव गाठीशी असतात....आणि ते जिवंत अनुभव खूप काही शिकवून जातात.काय महत्वाचे असते जगण्यासाठी,रोजच्या आपल्या उठण्या बसण्यात लहान मोठ्या अनेक गोष्टी घडत असतात. आपल्यासाठी एखादी खूप महत्वाची वाटणारी गोष्ट सगळ्यांसाठी महत्वाची असेलच असे नाही.सगळे मनासारखेच होते असे नाही आणि ह्यात पण एक गम्मत आहे.मग आपण विचार करतो,आपल्या मेंदूला खाद्य मिळते.असं नक्की का झाले असेल,माझे काही चुकले असेल का,कि हा पण एक अनुभव असं समजून राहावे,शांत राहावे,जे घडून गेले ते घडून गेले,त्यावर विचार करून काहीच मिळत नाही. तसेच आनंदाचे क्षण येतात आणि मग स्वतःचा विसर पडतो,एखाद्या वेळी अचानक स्नो पडू लागला कि जसे वाटते एकदम गार आणि नवीन,जिवंत झाल...

! पाऊस असा हा रुणझुणता !

इमेज
आज सकाळी नेहमीसारखी उठले , बाहेर सूर्यनारायणाने दडी मारलेली दिसली , आणि ' नभ मेघांनी आक्रमिले ' चा अनुभव आला . काळोख दाटून आलेला आणि पावसाची सर नुकतीच येऊन गेलेली ... परत येण्याची चिन्ह होती . हा इकडचा , कॅनडा चा पाऊस पाहिला कि खरच गम्मत वाटते . कधीतरी अगदी एखाद दुसरी सर आली तरीही , इथल्या लोकांची तारांबळ उडते . रेन बूट्स , छत्र्या , रेन कोटस घेण्यासाठी shopping centers,mall मध्ये थोडीशी गर्दी दिसते इतकंच त्या पावसाचे कौतुक ! छत्री उघडे उघडे पर्यंत म्हणता म्हणता पाऊस गायब होतो , आणि मग घरी येई पर्यंत पाऊस नाही .. कधी कधी अचानक येऊन भिजवून जातो खरा पण जाणवत पण नाही इतके कारण , घरी येईपर्यंत तुमचे कपडे बरयापैकी सुकलेले असतात , पण इकडच्या लोकांना एकाद दिवस जर थोडा जास्त पाऊस पडला तर कोण कौतुक वाटते त्याचे !' rainy day ' म्हणून त्या दिवसाचे नामकरण केले जाते . मग घरात बसून कंटाळा येतो अश्या दिवशी म्हणून shopping centers मध्य...