आठवणीत राहिलेली पहाट!
एक अशीच आठवणीत राहिलेली पहाट , नुकताच कोंबडा आरवलेला , बंबाच्या चुड्त्याच्चा धूर साठलेला आसमंतात , अंगण झाडणारी पलीकडच्या घरातली आजीबाई , आणि दूरवरच्या शिवालायातले आरतीचे स्वर .. पहाटेच्या वेळेचे एक वेगळेच संवेदन असते .. रस्त्यावरून गाड्यांची ,, लोकांची जोरदार वर्दळ सुरु न झाल्यामुळे रस्ता पण आळसावलेला वाटतो . दवाचे बिंदू समोरच्या प्राजक्ताच्या सड्यावर चमकत असतात , अळवाच्या पानांवर तर स्पष्ट दिसतात . उगवतीचा सुर्यनारायण डोळ्यात त्याचे रंग अलगदपणे उतरवतो . पक्ष्यांच्या किलबिलाटाने जवळपासची झाडे अजूनच हिरवी भासू लागतात .... सगळे कसे जिवंत होऊ लागते ! गरम चहाचा घोट घेताना घरासमोरच्या रस्त्यावरून नेहमीचे गाडीवाले , भाजीवाले आणि नंतर शाळकरी मुलांच्या जाण्यायेण्याकडे पहात , एक सकाळ परत सुरु होते ...... निवांतता हळू हळू गडबडीचे स्वरूप घेते . आता ती सकाळच्या स्वयंपाकाची गडबड , सर्वांना सर्व काही मिळाले न योग्य वेळी , ते पाहावे लागते . त्यातही एक नेहमीचा सूर असतो , सगळी...