पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक लोभस संध्याकाळ

इमेज
  संध्येचे वेगवेगळे रंग ,आणि आकाशी कोणी चित्रकाराने त्याची केलेली उधळण 👌 सूर्यास्ताच्या वेळी सूर्य बाप्पा,जाताना मागे त्याच्या अनेक छटा सोडून जातो.माझ्या घराच्या जवळ उंचावरून आकाश पाहताना हे लोभस रंग दृष्टीला सुखावतात.थंडीत वेगळे,उन्हाळ्यात आणि शिशिर ऋतूत वेगळे रंग..           काही छायाचित्र घेतली पण समाधान होत नाहीच! खरं तर डोळ्यांच्या कॅमेऱ्याने जे रंग दिसतात ते फोटोत तसेच्या तसे येणे अवघड!           किती तरी वेळ हे दृश्य पाहत होतो मी आणि माझी लेक,अश्यावेळी शब्द कुठेतरी हरवतात.मन ह्या रंगात रंगत जाते! Today's beautiful evening !!💕    -मोना (श्रिया)

क्षणभर विश्रांती

इमेज
 ह्या वर्षी उन्हाळा आलाय खरा,पण सगळेच स्तब्ध होते,रस्ते,शांत. थंडीचे महिने, बाहेर बराच वेळ घालवता येत नसल्याने,इकडे उन्हाळ्याची सगळे आतुरतेने वाट पाहत असतात. पण करोना साहेबानी यंदा सर्वाना घरी राहण्याची शिक्षा फर्मावलेली.आता कुठे जरा उसंत दिली;तेंव्हा हळू हळू थोडी वर्दळ दिसू लागली आहे.          इकडे उन्हाळा जेमतेम 4 महिने टिकतो,तसा सप्टेंबर शेवटी शेवटी गार होऊ लागतो...संध्याकाळचे गार वारे सुटते.त्या पूर्वी लोक भरपूर उन्हाळ्याचा आस्वाद घेऊन टाकतात...तसाच एक आमचा आजचा दिवस होता..घराजवळील पार्क मध्ये चटई घेऊन पोहोचलो,मी आणि माझी लेक..        निसर्गाच्या सानिध्यात आम्हा दोघींना भलतेच आवडते! झाडांचा,फुलांचा वास, फुलपाखरे, आणि गवतावर फिरणाऱ्या लहान मंडळींची लगबग बघायला आवडते.आज ज्या वृक्षाखाली आमच्या गप्पा रंगलेल्या त्याचे नाव weeping willow tree .ह्या वृक्षाखाली झोपून त्याचा प्रचंड विस्तार पाहायला खूप छान वाटत होते...त्याची पाने आणि फांद्या खालच्या दिशेने झुकलेल्या असतात, आणि वाऱ्यावर झुलताना पाहायला मस्तच वाटते.हा वृक्ष गूढ वाटतो. बुंधा बराच...