पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहिला हिमवर्षाव ..

इमेज
त्याचे शुभ्र कण सगळीकडे पसरले.वाऱ्याचा झोत आकाशातून येताना घेऊन आला थंडावा! आज त्याच्या आगमनाचा पहिला दिवस ! आकाश झाकोळून आपण येण्याची आगामी सूचना पाठवून,सूर्यनारायणाचा सुटीचा दिवस म्हणायचा ! काळोख जायलाच तयार नव्हता,जेमतेम सकाळ झाल्यासारखी. हिवाळा !!! थंडीची जोरदार सुरवात ...किती पटकन थंडी येते इकडे ! उन्हाळा थोडा येऊन जातो,आणि मग आपले वर्चस्व सिद्ध करायला हिवाळा हजर होतो. रात्र लांबलचक,काळोख 5 वाजता संध्याकाळी,आणि दिवस तसा रजईत दडी मारून बसण्यासारखा! पण थंडी हा इकडचा मुख्य ऋतू,आणि त्याच्या येण्याने फक्त जॅकेट,थंडीचे कपडे,बूट आणि गाडीला स्नो टायर हा बदल अंगवळणी पडल्यागत ! लहान मुलांना स्नोचे विशेष कौतुक! मलाही हा आवडतो,कारण ह्याला ह्याचे एक स्वतंत्र महत्व आहे.रस्त्यात गाड्यांची सगळी मस्ती हा सहज उतरवतो..शिस्त आणि गाड्यांचे कमी झालेले वेग पाहून बेट्याची कमाल वाटते! निसरड्या रस्त्यांमुळे सगळे आपापली वाहने जपून चालवू लागतात,ऑटो ट्राफिक कंट्रोल दिसतो. थंडीचे वेगवेगळ्या रंगांचे स्वेटर,जॅकेट,हॅट्स,स्कार्फ...लहान गोंडयांच्या स्नो हॅट्स शाळा सुटली कि पाठीवर बॅग घेऊन स्नो मध्ये मनमुरा...

एक रूपक

एक सावली उन्हाच्या अगदी जवळपास विसावलेली.  उन्हाचा   रट्टा,  दुपारचा कडक फटका तिच्या अंगवळणी पडलेला,सवयीचा झालेला.  त्याची तगमग, म्हणजेच त्याच्या मनातली झळ. सावली गार, सतत थंडावा देणारी.तिचे वेगवेगळे आकार,तिच्या वेगळंवेगळ्या लांब्या. ऊन पण कमी जास्त होणारे,तो उन्हासारखा.  अचानक तापणार; पण ती मात्र सतत सावली सारखी मागे पुढे धावत त्याच्या.  ह्या दोघांमध्ये येणार म्हणजे फक्त पाऊस! तो आला कि असा गारवा  पसरतो कि ऊनं नाहींसे झाल्यागत आणि सावली हरवलेली.  हा पाऊस त्या दोघांना त्यांच्या कामांपासून,थोडा वेळ कुठेतरी लांब घेऊन जाऊन, कधी गडगडाट करत तर कधी चमचमाट करत राहतो.  त्या दोघांना पाऊस आवडतो,मनापासून ! मग स्वप्न फुलतात,गीते उमलतात,नवीन मनाला पालवी फुटते .  तो त्याची कटुता विसरू लागतो. त्याच्यातले ऊन निवू लागते.आनंदाचे तुषार आणि भावनांचा पाऊस ! तिची सावली त्याला काही काळ नकोशी होते. ती दुरावते,थोडी रुसते.स्वतःत गुरफटते.त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करणे खूप अवघड असते पण ती तरीही ते झेलते .  ऊन सावलीला दुरावते....

काही मनातले ..

'दोन घडीचा डाव ' असा विचार कधीच मनाला चाटून जात नाही ना ! असं सवयीचे झालंय सगळेच! श्वास घेणे, सहज संथ लयीत चाललेले असते.सगळे आपापल्या विश्वात,धुंदीत,कैफात! मन मस्त मगन, मन मस्त मगन! खरेतर कुठे काही घडले, की त्याची बातमी होते. सर्वांनी वाचण्यासाठी वर्तमानपत्र ती छापतात. चॅनल वाले लहान पडद्यावर ती उमटवतात ! लगेच सर्व मीडिया वाले त्याची दखल घेतात.फार फार तर काही दिवस महिने बातमी फिरते, गोल गोल व्हाट्स ऍप पण मागे नसते. लोक चुकचुकतात, काही प्रक्षोभक लेख जन्मतात.बातमी जुनी झाली कि  तिचा भूतकाळ तयार होतो. परिणाम किती जणांवर खराखुरा होऊन पडसाद,प्रतिसादात उमटतात? एकतरी जिवंत चळवळ,काही क्रियात्मक जन्माला येते? नुसती बातमी कानावर पडून हवेत विरून धुवा धुवा, मग उद्या पुन्हा वृत्तपत्रात सापडतो बातम्यांचा खेळ नवा !! -मोना (श्रिया)

'केवडा'

इमेज
खरेतर चित्रपट दोन तासात मनोरंजन करतात, तरी बऱ्याचदा कमी पडतात . नेहमीच दोन तासात दिग्दर्शकाने आपल्यापर्यंत पोहोचवायच कथानक कधी कधी अपूर्ण वाटते. काही गाणी आवडतात म्हणून चित्रपट चालतो,कधी अभिनय आणि कधी कथा..सगळे एका ठिकाणी नेहमी सापडेल च असे सांगता येत नाही. तरी पूर्ण चित्रपटाचा वेळ, आणि इतक्या साऱ्या वेळात नक्कीच अपेक्षा वाढलेल्या असतात, मोठ्या पडद्यावर काही चमत्कार सापडेल,असे वाटत असते. लहान पडद्यावर, पाहून खूप आवडलेली लहानशी मराठी टेलेफिल्म, शॉर्ट फिल्म.. ह्यात अवघ्या 25 मिनिटात पाहणाऱ्यांना नक्की आवडेल अशी वाटली म्हणून इकडे देते आहे. मनात जे काही येते ही पाहून ते प्रत्येकाने आपापले ठरवायचंय! मला केवड्याचा सुगंध आजीला नक्कीच येत असेल त्या कुपीतून असे वाटले!तिच्या आयुष्यातल्या स्मृतींचा एकत्रित असा! हल्ली अश्या शॉर्ट फिल्म शोधत असते..दिग्दर्शक खूप कमाल करतात,आणि एव्हढ्याश्या वेळात जो मेसेज पाहणाऱ्यांच्या मनात पोहोचवायचा तो, उत्तम अभिनय, मोजके संवाद आणि कथानक ह्यातून पोहोचलेला असतो ! ' केवडा' नक्की बघा आणि काय वाटले ते नक्की सांगा. ...