पोस्ट्स

एप्रिल, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक कप चाय हो जाये!

इमेज
                                                  मला चहा कधी पासून आवडतो , नीटसे आठवत नाही . आई सांगते , मी लहान वर्षाची असताना , एक   किंवा दोन   चहाचे थेंब दुधाच्या मगात घालून , आजी चहाचा भास निर्माण करायची अन मला चकवायची . मला तो चहा वाटायचा आणि आवडीने त्यात बिक्की बुडवून स्वाहा व्हायचे . घरात लहानपणी दुध पिणे अगदी आपल्या चार चौघांच्या घरात नियम म्हणून असते तसे होतेच ! मला तरीही चहाच आवडला .          मी लहानपणापासून चहाशी जी मैत्री केली ती आजतागायत टिकली आहे . अजुन ही काही ' चायमय ' झालेले प्रसंग आठवतात . बाबांच्या मित्रमंडळाचे ' संगीताचे कार्यक्रम '. आपापली कामे आवरून , साधारण सात वाजेपर्यंत सगळी मंडळी घराच्या खालच्या खोलीत जमत . मेहेफील मध्ये तबला , पेटी , तंबोरा , इत्यादी वाद्यांचा समावेश असे . साधारण सहा ते सा...