'जत्रा'
बरेच काही हरवल्याची खंत मनात घेऊन आणि नवीन काही करण्याची जिद्द मनात ठेवून , नव्या वर्षाचे स्वागत करत पुढे जाताना , जमा खर्चाचा आढावा डोळ्यासमोर आला . प्रत्येक वर्ष अनेक क्षणांचे गुपित घेऊन दारावर येते . वर्षातील बारा महिन्यातला शेवटचा महिना लागला कि काय पटकन वर्ष सरले ह्याची जाणीव होऊ लागते . काय केले , काय नाही ह्याची उलाघाल सुरु होते . पटापट वर्षाच्या शेवटी उरकायची महत्वाची कामांची जमवाजमव करून हे वर्ष संपते आहे असे स्वतःला बजावत हळूच राहिलेल्या कामांची बांधाबांध करायची . आपले घर , नातेवाईक , शेजारी पाजारी , मित्रमंडळ , कामाच्या ठिकाणी जमवलेली माणसे हि आपली चाकोरी . ह्याबाहेरचे जग म्हणजे अनोळखी माणसांनी भरलेली एक जागा . एका माझ्या सखीचे एक वाक्य आठवले , ती म्हणालेली ,' प्रत्येकाची एक विहीर असते , आपली अशी सुखदुःखाची', होय तशीच आपली विहीर आणि भोवतालचे जग . ह्या जगातल्या कडू गोड घडामोडी . ह्यांचा वर्षाचा अहवाल डोळ...