'TIME प्लीज'....
"Time please"……"अहं मी लेखाच्या सुरवातीलाच विश्रांती घेत नाहीये काही! लेख लिहून नक्कीच पूर्ण करणार आहे." खरेतर एखादी कथा आणि चित्रपटात,ती कथा जेंव्हा जिवंत होऊन समोर येते तेव्हाचे तिचे दृश्य स्वरूप,त्यातील व्यक्तिरेखा,संवाद,प्रसंगांची मांडणी,संगीत,सगळे सगळे किती किती महत्वाचे असते न तो चित्रपट आवडायला. आजकालच्या धावत्या जगात,रोजच्या दैनंदिन आयुष्यातून विरंगुळा म्हणून काहीतरी वेगळे पाहण्यासाठी, चित्रपट गृहात प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी नाही.काहीतरी हलके फुलके,स्ट्रेस विसरायला लावणारे,साधीच कथा, उगाच कंटाळवाणी न वाटणारी,आनंद देणारी आणि काहीतरी संदेश देणारी असेल,तर मग काय विचारता! अमृता आणि ऋषिकेश एकमेकांना भेटतात.ऋषिकेश एकदाचा तिशीला येउन लग्नाला तयार होतो,आणि घरातल्या मावशीला कोण आनंद होतो ! नवीन संसार,नवे घर,एकमेकांना समजून घेण्याचे दिवस.'Arranged marriage'.अमृताचा स्वभाव मोकळा ढाकळा, धमाल गमत्या,आयुष्याला येईल तसे घेणारी अमृता.तर ऋषी त्याउलट,आईवडिलांशिवाय मोठा झालेला ऋषी,नात्यांना ज...