'मन्या द वंडर बॉय'
'मन्या द वंडर बॉय',नावात सगळे आले आहे का? पहायलाच हवं...म्हणून चित्रपट पाहू लागले आणि सर्व वयोगटातील व्यक्तींनी पहावा असा हा मराठी चित्रपट,शेवटपर्यंत मला माझ्या जागेवरून उठू देईना! एका गावात लहानगा मन्या (रीशीराज पवार ), त्याचे आई वडील आणि बहिणीसोबत, रहात असतो. मन्या आठवीत,शाळेत जाण्यास उत्सुक पण घरात बिछान्याला खिळलेले वडील त्यामुळे घरातली कामे देखील हिरहिरीने करत असतो.घरात गाई आणि दुधदुभते.बहिण आणि तो आईला मदत करून मग शाळेत जात असतात. दुग्धालयात दुध पोहोचवून शाळेत जाईस्तोवर नेहमी होणारा उशीर,आणि त्यामुळे शाळेत होणारे हसे,अपमान पचवणारा बोलक्या डोळ्यांचा मन्या.मन्याचा मित्र 'ओम्या'नेहमी मन्याला सांभाळून घेणारा,वेळी अबोला धरणारा पण मदत करणारा,आणि 'जाई' जिच्या आयुष्यात खूप लहान वयात आई वडिलांचे छत्र हिरावले जाते आणि काकांच्या घरी आधाराला राहिलेली अशी हि मन्याची मैत्रीण.मन्याला शाळेत उशीर होऊ नये म्हणून बाबा,आणि बहिण मिळून त्याच्यासाठी एक पाठीवर लावायची पिशवी शिवतात,हात रिकामे ...