पोस्ट्स

सप्टेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रामेश्वराच्या सान्निध्यात .....

इमेज
                रामेश्वराचे आवार डोळ्यासमोर उभे राहिले आहे.आज का कोण जाणे,सकाळपासून ह्या देवालयाची आठवण येते आहे.आठवण स्वस्थ बसू देत नाही आणि तिला जिवंत व्हायचे असते कागदावर!  शांत हिरवळीने नटलेले कोकणातले रेवदंडा आणि आसपासचा परिसर,,निसर्गाने दिलेले वरदान.गावापासून थोड्याच अंतरावर चौल फाट्याजवळ हे देऊळ आहे.पुरातन असे हे देवालय आजही डोळ्यांसमोर येते.किती वेळा बालपणी ह्याच्या आवारात गेले आहे.समोरची पोखरण,त्याच्या भोवती वसलेली कौलारू घरे आणि पाठी नारळी पोफळीची झाडे,आजही,वाऱ्याने हलता डूलताना,आता डोळे मिटले तर दिसत आहेत.ह्या देवळात प्रत्येक मुख्य सणाला लहान मोठे कार्यक्रम असत.देवळासमोर दीपमाळा होत्या.मुख्य श्री शंकराचे स्थान आणि मग लहान अश्या काळ्या दगडातल्या विठ्ठल रखुमाई,राम सीता,ह्या दैवतांच्या मुरत्या आहेत.देवळाच्या पायऱ्या उतरताना दोन्ही बाजूला बैठक आहे जिथे पांथस्थ मंडळी विसावतात.          बालपणी हे देऊळ खूपच मोठे,अवाढव्य भासायचे.देवळाचा आतला भाग,घुमट,शिवाचे स्थान आणि त्या गाभाऱ्यातल...