पोस्ट्स

ऑगस्ट, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक संवेदनशील कलाकृती!

इमेज
                    एक लहानस गाव.गावात यशोदेचे लहानसे घर.घरासमोर विहीर आणि गोठ्यात गाय आणि वासरू...यशोदा गरीब पण स्वाभिमानी.स्वतःचे मूल नसताना प्रेमाने सवतीच्या मुलीचे,सुरेखाचे करणारी,तिच्या आजारासाठी ऑपरेशनचे पैसे जमवण्यासाठी खूप मोठा निर्णय घेऊन बसते.यशोदेचा नवरा तिला सोडून निघून गेलेला असतो. शेतात कष्ट करून आपले आणि सुरेखाचे करणारी यशोदा मोठ्या जिद्दीची दाखवली आहे.मेरी नावाची एक गोरी आणि तिचा नवरा परदेशातून भारतात येतात.बाळंतपणाची भीती आणि सौदर्य कमी होते म्हणून स्वतःच्या गर्भात हे बाळ मोठे न करता यशोदाला हि जबाबदारी देणारी गोरीपान सोनेरी केसांची मेरी यशोदाला समजून घेण्यासाठी तिच्यासोबत तिच्या घरी राहते.डॉक्टर बाई यशोदाला सगळे काही व्यवस्थित समजावून देतात.'सरोगेट मदर' म्हणजे काय हे जाणून घेऊन फक्त स्वतःच्या लेकीसाठी,इतकी मोठी गोष्ट करायला तयार झालेली यशोदा,मेरी सोबत देशाबाहेर न जाता स्वतःच्या घरातच राहण्याचा निर्णय घेते आणि मेरीला,अनेक गोष्टी नव्याने शिकवते...मेरीचा नवरा परत जातो पण मेरी मात्र माघारी यशोदा सोबत म्हणजे अर्थात,यशोद...