पोस्ट्स

जुलै, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काही खटकलेले..

        मनात आलेले खूप दिवस मांडायचे राहून जात होते मग अगदी ठरवून आज काही मनात बोचणारे लिहायचे ठरवले.तसे आणखीनही विषय आहेत पण जे ह्या गेल्या काही दिवसात जास्ती जाणवले ते इथे मांडते आहे.           काव्य आणि विनोद ह्याहून वेगळे,थोडेसे जाणवणारे,कुठेतरी खोल रूतणारे आणि प्रश्न निर्माण करणारे काही....आणि काही अनुभवातून जाणवलेले सत्य.         'कोरडेपणा जगातला वाढत जातो आहे' अगदी 'खटखटीत कोरडेपण'.सगळीकडे उन्नती असूनही असूया जास्त दिसते.सतत एकमेकांशी स्पर्धा करत राहणे म्हणजे प्रगती आहे का?       अपेक्षा मग त्या अर्थार्जनाच्या असोत किंवा आणखीन कोणत्याही त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर माणसाला स्थैर्य नाही.मुलभूत गरजा भागून पूर्वी मंडळी खुश असत...किंवा तसा प्रयत्न असे..पण आज गरजा आपला जबडा विस्तारत जात आहेत...आणि माणूस त्यामुळे पूर्णपणे त्या जबड्यात अडकत चालला आहे.महागाई वाढली पण पगार देखील वाढलेच कि..जे जमणार नसेल त्याच्यापाठी लागून आलेले सोन्यासारखे दिवस आणि क्षण फुकट घालवले जातात.किती तो कामाचा बोजवारा!!कधी कधी...