पोस्ट्स

जून, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उंच जाई झोका !

इमेज
          हल्लीच ' उंच माझा झोका ' ह्या मालिकेचे भाग पाहण्यात आले . कै . रमाबाई रानडे ह्यांच्या आयुष्यावर रेखलेली हि मालिका . कुतूहल होते , कारण अनेकांकडून ह्या मालिकेचे नाव ऐकले होते म्हणून पाहण्याचा मोह झाला . उत्तम सादरीकरण आणि अभिनय , दोन्हीचे पाठबळ लाभलेली हि मालिका पाहायला सुरवात केली आणि मग काय ... पुढे पुढे पाहण्याची इच्छा , आणि रोज काहीतरी नवे शिकायला मिळते आहे असा अनुभव येत गेला . रमा बाईंचा जन्म ५ जानेवारी १८६२ सालातला .. त्यांनी त्या काळात स्वतः शिक्षण घेऊन स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला तसेच ' सेवासदन ' ह्या संस्थेच्या मुख्य कार्यकर्त्या आणि ' हुजूरपागा ' हि शाळा पुण्यात काढणाऱ्या सुधारक विचारांच्या रमाबाई , आणि त्यांचे पती न्यायमूर्ती . महादेव गोविंद रानडे ह्यांचे कार्य दाखवणारी हि ' झी मराठी ' वरील   मालिका आहे .        जुन्या स्वातंत्र्यपूर्व काळातले पुणे शहर , ते वातावरण , डोळ्यापुढे उभे केले आहे दि...