अश्रू...
तिचे अश्रूच सांगतात तिची कहाणी.... पूर्ण वाहून गेले तरी.. निशब्द ढळत राहतात... त्यांची अन तिची साथ.. जुनी, युगायुगांची... तिच्या आनंदात सामावलेली... तिच्या वेदनेत भिजलेली.... क्लेशांच्या पलीकडे उठून उभे राहायचा एक यत्न केला होता तिने .. कधीतरी.. तेव्हा हट्टाला पेटले होते अश्रू... अन एक सागर बनला.. सर्वांना कळेल तिचे दुःख म्हणून पिऊन टाकले होते.. पण क्षणिक उरले ते.... मोत्याचे टपोरे दाणे ... तिला अलगद मोरपिसासारखे कुरवाळत ओघळतात जेव्हा.... तिलाच कळत नाही... अडवायचे की वाट करून द्यायची.. ’पुरे झाले आवर गं आता ’.... येई अनाहूत सल्ला.. वेदना,भावना आवरायचा उपदेश.... जगाला सगळ्यांचा खटाटोप.... उन्मळून पडणे काय हे फक्त त्या वृक्षालाच ठाऊक! खोटे हसता येत नाही.. ही काही चूक नाही.. दुःख तरी प्रांजळ असते.. खरे आणि जिवंत.... सजीव असण्याची साक्ष देणारे.. तिच्या भावना ती एकटीच ढाळते.... अश्रूमय.. विझवायचे ...