'श्रीयुत गंगाधर टिपरे' एक आगळी वेगळी मालिका!
टिपरे कुटुंबीय फक्त शलाका दिसत नाहीये आपले'आबा'आपल्याला आपलेसे करून घेणारे आबा. आबा म्हणजे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'....टिपरे कुटुंबियांमध्ये अग्रणी आणि सर्वांच्या मनात घर करून राहिलेले असे.दूरदर्शनवरील लक्षात राहिलेल्या काही मालिकांमध्ये 'श्रीयुत गंगाधर टिपरे'ही श्री केदार शिंदे दिग्दर्शित...एक मालिका विशेषकरून लक्षात राहिली मला.'झी मराठी'वर दाखवण्यात येणाऱ्या ह्या मालिकेतले आबांचे व्यक्तिमत्वच तसे आहे! ह्या भूमिकेत श्री.दिलीप प्रभावळकर ह्यांनी अप्रतीम कामगिरी केली आहे. ही मालिका श्री प्रभावळकर लिखित"अनुदिनी"ह्या पुस्तकावर आहे...हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनाने १९९८ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित केले होते.श्री.प्रभावळकर लिखित ह्या आबांच्या व्यक्तिमत्वाचे खरच कौतुक करावेसे वाटते,हे असे धोतर घातलेले आजोबा,शिस्तीचे पण तरीही प्रेमळ,स्वतःच्या मुलाला सुनेला सांभाळून घेणारे,वेळी योग्य मार्गदर्शन करणारे,नातवंडांचे लाडके आबा.... ही दरवेळी काहीतरी नव...