'कवडसे'
'कवडसे',किती सुंदर आणि किती स्मृतींच्या मागे पुढे पडलेले !!!...जरा ऊन आले कि पटकन एखाद्या खिडकीच्या फटीतून आलेला एक उभा कवडसा... त्या कवड्श्यामध्ये नाचणारे धुळीचे कण.सावली आणि ऊन ह्यांचा खेळ.केळीच्या हलणाऱ्या पानाशी खेळणारे ऊन, वारयामुळे ह्या पानाची एक हालचाल,हलणारी सावली. दुपारी लहानपणी झोप यायची नाही पण आई सुटीच्या दिवशी मागे लागायची,थोडा वेळ आमची मस्ती कमी व्हावी म्हणून असणार आणि दुपारची शांतता राहावी हा दुसरा उद्देश.मग काय,अजूनही आठवते,कौलारू छपरातून ऊन कसे आत डोकवायचे,लहान लहान उन्हाचे कवडसे,काही उतरून पलंगावर उताणे पडलेल्या माझ्या अंगावर पडत.मग मी उठून ते हाताच्या तळव्यावर घ्यायचा प्रयत्न करायचे.कधी कधी एकदम वर्तुळाकार असे देखील कवडसे येत.काळोख असलेल्या त्या खोलीत हे 'कौलारू ऊन' हवेहवेसे वाटायचे!पूर्ण दुपार नाही पण थोडीशी दुपार जेव्हां जाग असायची मला,मी असा हा उन कवड्श्यांचा खेळ पाहायचे.ताटावर उन झेलून त्याच्याव...