!!! शुभ दीपावली !!!
दिवाळी...........दिव्यांची,आकाश कंदीलांची,रांगोळीची,अभ्यंगस्नानाची,फराळाची,फटाक्यांची,बहार! वर्षातून एकदा येणारी हि दिवाळी सगळ्यांना आनंद देते.अनेक शुभेच्छा,भेटकार्डासोबत आणि मिठाई सोबत मैत्री घेऊन येते. हास्य विनोद,गप्पा रंगतात.नातेवाईक,आप्त,सर्वांच्या मेळाव्यात,एकत्र आनंदात सहभागी होऊन आपण आपले रोजचे जग थोडे बाजूला ठेवतो.दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणाचे महत्व जाणवते.लहानांना दिवाळीची गोष्ट सांगून पुढे दिवाळी अशीच येत राहावी आणि साजरी होत राहावी असा मोठ्यांचा प्रयत्न असतो.सर्वांना हा सण खूप आवडतो.नवीन कपडे,नवीन खरेदी आणि त्यासाठी लोकांची बाजारात झालेली गर्दी, उडालेली झुंबड,किती किती उत्साह ओसंडत असतो सर्वत्र! धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी),लक्ष्मीपूजन,पाडवा किवा बलिप्रतिपदा आणि भाऊबीज....तुळशी विवाह हे दीपावलीचे दिवस .श्री ...