'केवडा'
खरेतर चित्रपट दोन तासात मनोरंजन करतात, तरी बऱ्याचदा कमी पडतात . नेहमीच दोन तासात दिग्दर्शकाने आपल्यापर्यंत पोहोचवायच कथानक कधी कधी अपूर्ण वाटते. काही गाणी आवडतात म्हणून चित्रपट चालतो,कधी अभिनय आणि कधी कथा..सगळे एका ठिकाणी नेहमी सापडेल च असे सांगता येत नाही. तरी पूर्ण चित्रपटाचा वेळ, आणि इतक्या साऱ्या वेळात नक्कीच अपेक्षा वाढलेल्या असतात, मोठ्या पडद्यावर काही चमत्कार सापडेल,असे वाटत असते. लहान पडद्यावर, पाहून खूप आवडलेली लहानशी मराठी टेलेफिल्म, शॉर्ट फिल्म.. ह्यात अवघ्या 25 मिनिटात पाहणाऱ्यांना नक्की आवडेल अशी वाटली म्हणून इकडे देते आहे. मनात जे काही येते ही पाहून ते प्रत्येकाने आपापले ठरवायचंय! मला केवड्याचा सुगंध आजीला नक्कीच येत असेल त्या कुपीतून असे वाटले!तिच्या आयुष्यातल्या स्मृतींचा एकत्रित असा! हल्ली अश्या शॉर्ट फिल्म शोधत असते..दिग्दर्शक खूप कमाल करतात,आणि एव्हढ्याश्या वेळात जो मेसेज पाहणाऱ्यांच्या मनात पोहोचवायचा तो, उत्तम अभिनय, मोजके संवाद आणि कथानक ह्यातून पोहोचलेला असतो ! ' केवडा' नक्की बघा आणि काय वाटले ते नक्की सांगा. ...