पोस्ट्स

मार्च, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चुरमुरा

इमेज
        आज  चुरमुर्‍यांचा  चिवडा बनवताना परत एकदा मला  एक परकरातली चिमुरडी दिसू लागली.तिच्या इवल्याश्या चिमटीत एक एक चुरमुरा पकडून वाटीत टाकून,मग परत सगळी वाटी उलटी  पाडून  सांडलेले चुरमुरे...एक एक चिमटीत धरून उचलून खाणारी.दोन लहान शेंड्या बांधलेली,आठवू लागली. छानसा परकर पोलका  तिचा, मळलेला साफ कारण,दिवसभर जमिनीवर खेळ,आणि स्वयंपाक,तो पण भातुकलीची बोळखी घेऊन  आणि प्रत्येक लहानग्या वाटणाऱ्या पातेल्यात,जे तिचे 'मोठे भांडे'..तिच्या शब्दात " मोत्थे पातेले" सगळ्यात काही न काही बनत असायचे.सतत शिजत असायचे.         चुरमुर्‍यांचा  भात,इवलूसे  पाणी घालून इतका छान मऊ शिजायचा तर  कधी एकदम गुरगुट ला होऊन  पानात यायचा.'वनन डाळीचे' अगदी गरम..गरम हं! .. हळुवार,भुरके न  मारता,आवाज न करता प्यावे लागायचे.डाळ अलगद जर वेचू लागले कोणी,तर दटावणी यायची "दाल खायची अश्ते..वेचायची नाही." आईने दिलेल्या पीठाचे चिकट पोळे,लहानग्या पोळपाटापेक्षा हातावर,बोटांवर आणि परकरावरच जास्त चिटकून बसत,पण कधी म्हणून कधी चिडचि...